Posts

Showing posts from August, 2022

हायकू

रसग्रहण- ४४ उठे तरंग पुष्करणीत हळू डूबे विहंग दिलिप शिरपूरकर कारंज्याभोवती असलेल्या तळ्यात पक्ष्याने (मासे पकडण्यासाठी ?)  सूर मारावा, आणि त्यामुळे पाण्यावर हलकेच तरंगत उठावा असे काहीसे चित्र डोळ्यांसमोर उभे रहाते. डूबे शब्दाऐवजी कदाचित् डुंबे असतं, तर जलक्रीडा करणाऱ्या पक्षांचं चित्र दिसलं असतं. डूबे हा हिंदी शब्द बुडून जाणे या अर्थी आहे. पक्षाला आकाशात गोळी लागून तो पुष्करणीत पडलाय का ? पण तसं असेल तर तो धपकन पडेल. तरंग हळू उठणार नाही.  अर्थ मला नीट स्पष्ट होत नाहीये. पक्ष्याचे पुष्करणीत डुबणे आणि पाण्यावर तरंग उठणे , ही दोन बिंबे दिसतात. डुबण्याचा क्षणही आहे. यमक, अक्षरसंख्या या नियमांमधे हायकू बसतो. मूळ अर्थच मला नीट समजला नाही, त्यामुळे पुढचे रसग्रहण करता येत नाही. क्षमस्व. धन्यवाद.🙏 डॉ रमा खटावकर.

प्रेरणा

प्रेरणा मरगळलेल्या मनाला प्रेरणेची साद पहील्या वहिल्या प्रयत्नाला उत्तेजनाची दाद त्यास मला भेटली होती सुसंस्कारांची जोड चालत असता आठवली मग थोडीशी तडजोड धडे मी गिरवले वडील भाऊ बहिणीचे पालक गुरुजनांचे दालन नव्या ज्ञानाचे प्रयत्नांची मी धरली कास कष्टाने झालो नाही उदास अदृश्य देवता सोबत होती मातापिता सदैव साथ देती दिलीप शिरपुरकर