Posts

Showing posts from October, 2022

निरागस प्रेम

आई तुझं ग निरागस प्रेम  पुन्हा कधी येईल वाट्याला वाट ही चालताना ही कसे सांगू मी काट्याला  आई तुझं ग निरागस प्रेम पुन्हा कधी मिळणार नाही आयुष्य संपले तरीही मी विसरणार नाही आई तुझं ग निरागस प्रेम मला पुरेल जन्मभर दिस जातील माझे हे कसे विसरू आयुष्यभर आई तुझं ग निरागस प्रेम हीच मला ग शिदोरी जीवन कंठींतो त्याच्यावर माया ममता अधुरी आई तुझं ग निरागस प्रेम कधी विसर पडेना रोज आठवी तुला ग दिवस एकही जाईना आई तुझं ग निरागस प्रेम वाटता वाटून संपेना साऱ्या लेकरा देऊन बघ आटता आटेना आई तुझं ग निरागस प्रेम सर्वांहून असे निराळं कुणी कितीही द्यावं किती आगळं वेगळं आई तुझं ग निरागस प्रेम जगी दुसरी उपमा नाही किती फेडू पांग तुझे हे तुझा पदर माझ्या डोई आई तुझं ग निरागस प्रेम किती वर्णिल्या जाईना शब्द अपुरे पडती अगं सांगल्या जाईना आई तुझे ग निरागस प्रेम ज्याला लाभेल तो सुखी दिन रात नाव येवो तुझेच ग माझ्या मुखी दिलीप शिरपूरकर दि 8 मे 2022 मातृदिन

बायकोचा वाढदिवस

भल्या सकाळी दिवाळी पहाट राहुल देशपांडेंचे गायन अफाट आवडीचा नाश्ता दहिवडा मुलाने जमविला बेत बडा सुनेने घेतला आवडीचा ड्रेस परिधान करता सजला वेष नातवाने आणला भला मोठा केक पतीने आणला काजू कतली मेक ओवाळणे आणि फोटो आनंदात वाढदिवस साजरा माझ्या कुटुंबात रात्रीचा जमला पाव भाजीचा बेत एन्जॉय केला आम्ही सर्वा समवेत दिलीप शिरपुरकर

माहेरची ओढ

माहेरची ओढ, लग्न झाल्यावर कळते नवा संसार थाटता रोज आई आठवते माहेरची ओढ, रोज नव्या परीक्षेचा दिवस दिरापेक्षा भाऊ माझा आता दिसतो सरस माहेरची ओढ,सणावाराच्या निमित्ताने जाऊ रोज वाटते मजला येईल न्यावयाला भाऊ माहेरची ओढ,आली दिवाळी ही महिनाभर पंधरा दिवसाचा बेत मग येई दोन दिवसांवर माहेरची ओढ, माय असे तवरच राहते मग हळू हळू मला माझे घरच आवडते माझे घरच आवडते दिलीप शिरपुरकर