निरागस प्रेम


आई तुझं ग निरागस प्रेम 
पुन्हा कधी येईल वाट्याला
वाट ही चालताना ही
कसे सांगू मी काट्याला 

आई तुझं ग निरागस प्रेम
पुन्हा कधी मिळणार नाही
आयुष्य संपले तरीही
मी विसरणार नाही

आई तुझं ग निरागस प्रेम
मला पुरेल जन्मभर
दिस जातील माझे हे
कसे विसरू आयुष्यभर

आई तुझं ग निरागस प्रेम
हीच मला ग शिदोरी
जीवन कंठींतो त्याच्यावर
माया ममता अधुरी

आई तुझं ग निरागस प्रेम
कधी विसर पडेना
रोज आठवी तुला ग
दिवस एकही जाईना

आई तुझं ग निरागस प्रेम
वाटता वाटून संपेना
साऱ्या लेकरा देऊन
बघ आटता आटेना

आई तुझं ग निरागस प्रेम
सर्वांहून असे निराळं
कुणी कितीही द्यावं
किती आगळं वेगळं

आई तुझं ग निरागस प्रेम
जगी दुसरी उपमा नाही
किती फेडू पांग तुझे हे
तुझा पदर माझ्या डोई

आई तुझं ग निरागस प्रेम
किती वर्णिल्या जाईना
शब्द अपुरे पडती
अगं सांगल्या जाईना

आई तुझे ग निरागस प्रेम
ज्याला लाभेल तो सुखी
दिन रात नाव येवो
तुझेच ग माझ्या मुखी

दिलीप शिरपूरकर
दि 8 मे 2022
मातृदिन

Comments

Popular posts from this blog

हायकू रसग्रहण

संसारदृष्ट लागेल असा संसार तुझासर्वानाच असे कौतुकाचाप्रश्न मिटला होता आताआईच्या मोठ्या काळजीचाखरंच दृष्ट लागली कुण्या पाप्याचीमनेच थिजली आपसात लीएव्हढे दिले ईश्वराने कीओंजळच फाटली दानाचीसुख तरी परमेश्वरानेअजून काय द्यावे बरेभेटलेले लाभावयात्यास लीन व्हावे खरेउगीचच रडतो आपणदुःख एव्हढे नसतानादिव्यांगही हसत असतातजीवन आपले जगतानाप्रार्थना करतो देवालाईडा पीडा टळू देपूर्वीसारखा संसार माझ्याभावाचा सुरू होऊ देदिलीप शिरपूरकर