माहेरची ओढ


माहेरची ओढ, लग्न झाल्यावर कळते
नवा संसार थाटता रोज आई आठवते

माहेरची ओढ, रोज नव्या परीक्षेचा दिवस
दिरापेक्षा भाऊ माझा आता दिसतो सरस

माहेरची ओढ,सणावाराच्या निमित्ताने जाऊ
रोज वाटते मजला येईल न्यावयाला भाऊ

माहेरची ओढ,आली दिवाळी ही महिनाभर
पंधरा दिवसाचा बेत मग येई दोन दिवसांवर

माहेरची ओढ, माय असे तवरच राहते
मग हळू हळू मला माझे घरच आवडते

माझे घरच आवडते

दिलीप शिरपुरकर

Comments

Popular posts from this blog

निरागस प्रेम

हायकू रसग्रहण

संसारदृष्ट लागेल असा संसार तुझासर्वानाच असे कौतुकाचाप्रश्न मिटला होता आताआईच्या मोठ्या काळजीचाखरंच दृष्ट लागली कुण्या पाप्याचीमनेच थिजली आपसात लीएव्हढे दिले ईश्वराने कीओंजळच फाटली दानाचीसुख तरी परमेश्वरानेअजून काय द्यावे बरेभेटलेले लाभावयात्यास लीन व्हावे खरेउगीचच रडतो आपणदुःख एव्हढे नसतानादिव्यांगही हसत असतातजीवन आपले जगतानाप्रार्थना करतो देवालाईडा पीडा टळू देपूर्वीसारखा संसार माझ्याभावाचा सुरू होऊ देदिलीप शिरपूरकर