प्रेरणा

प्रेरणा

मरगळलेल्या मनाला
प्रेरणेची साद
पहील्या वहिल्या प्रयत्नाला
उत्तेजनाची दाद

त्यास मला भेटली होती
सुसंस्कारांची जोड
चालत असता आठवली
मग थोडीशी तडजोड

धडे मी गिरवले
वडील भाऊ बहिणीचे
पालक गुरुजनांचे
दालन नव्या ज्ञानाचे

प्रयत्नांची मी धरली कास
कष्टाने झालो नाही उदास
अदृश्य देवता सोबत होती
मातापिता सदैव साथ देती

दिलीप शिरपुरकर

Comments

Popular posts from this blog

निरागस प्रेम

हायकू रसग्रहण

संसारदृष्ट लागेल असा संसार तुझासर्वानाच असे कौतुकाचाप्रश्न मिटला होता आताआईच्या मोठ्या काळजीचाखरंच दृष्ट लागली कुण्या पाप्याचीमनेच थिजली आपसात लीएव्हढे दिले ईश्वराने कीओंजळच फाटली दानाचीसुख तरी परमेश्वरानेअजून काय द्यावे बरेभेटलेले लाभावयात्यास लीन व्हावे खरेउगीचच रडतो आपणदुःख एव्हढे नसतानादिव्यांगही हसत असतातजीवन आपले जगतानाप्रार्थना करतो देवालाईडा पीडा टळू देपूर्वीसारखा संसार माझ्याभावाचा सुरू होऊ देदिलीप शिरपूरकर