कविता
कविता
कविता असते वेदनेचा हुंकार
कविता असते भावनेचा आविष्कार
कविता असते जागृत चेतना
कविता असते मनो कल्पना
कविता असते आसमंताची जाण
व्यथित जिवाच्या दुःखाचे भान
कविता असते मनाची जोड
कुठे तरी लावी आंतरिक ओढ
कविता देते प्रेमाची चाहूल
बहरे जीवन येई फुलून
दिलीप शिरपुरकर
Comments
Post a Comment